अधिवेशन काळात कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरील कोगनोळी नाक्यावर कर्नाटकच्या बसेस रोखू व कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या मंत्र्यांना रोखू शिवसेना उद्धव ठाकरे गट,देवणे इशारा,
,बेळगाव येथे कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन दि. ९/१२/२०२४ रोजी सुरु होत आहे. या अधिवेशन काळात दि. ९/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास परवानगी याचा रितसर अर्ज जिल्हाधिकारी बेळगाव यांना दिला आहे. गेल्या ३ ते ४ वर्षात कर्नाटक सरकारचा व्यवहार पाहता दडपशाहीने कर्नाटक सरकार महामेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीला घेऊ देत नाही तसेच महाराष्ट्रातील नेत्याना बेळगावला जाणेस बंदी घातली जाते हे लोकशाहीला सोडून आहे. याच काळात कर्नाटकातील अनेक मंत्री महाराष्ट्रात व कोल्हापूरला येतात त्यांना महाराष्ट्र सरकार कोणतीच बंदी घालत नाही. आम्ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने आपणास मागणी करत आहोत की बेळगाव येथील ९/१२/२०२४ च्या महामेळाव्यास बेळगाव जिल्हाधिकारी यांनी परवानगी दयावी व महाराष्ट्रातील नेत्याना बेळगावला जाणेस बंदी घालू नये तशा आमच्या भावना आपण महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी या नात्याने आपण बेळगाव जिल्हाधिकारी यांना महामेळाव्यास परवानगी दिली नाही तर महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने दि. ९/१२/२०२४ रोजी आंदोलन करु व कर्नाटकातील वाहनाना महाराष्ट्र सीमेवर अडवू या आमच्या तीव्र भावना आपण जिल्हाधिकारी बेळगाव याना लेखी स्वरुपात
कळवाव्यात ही नम्र विनंती निवेदन द्वारा करण्यात आली आहे यावेळी
संजय पवार उपनेते, जिल्हाप्रमुख,विजय देवणे सह संपर्कप्रमुख,
सुनील मोदी शहर प्रमुख ,रविकिरण इंगवले शहर प्रमुख
हर्षल सुर्वे शहर समन्वक, विशाल देवकुळे शहर समन्वयक,
सौ. प्रतिज्ञा उत्तुरे जिल्हा महिला संघटक,धनाजी दळवी, मंजीत भावे, घोटने, , सुहास डोंगरे, / • राहुल माळी, पप्पु कोंडेकर, पुनम फडतार, नागेश पोवार अतुल परब, विकी कारकर, साहिल अस्तार, भारत पाटिल, युगंधर कांबळे, सह अनेक उपस्थित होते