Spread the love
  1. एस के सोसायटी संचलित जी एस एस पदवीपूर्व महाविद्यालय बेळगाव येथे (दिनांक 7 डिसेंबर शनिवार ) महाविद्यालयाच्या के. एम गिरी सभागृहात दोन दिवसीय आंतरशालेय वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महोत्सव “रेजोनन्स” चा शुभारंभ प्रमुख अतिथी गोगटे काॅलेजच्या प्रा. ॲड. सरिता पाटील यांच्या हस्ते झाला.

    या प्रसंगी व्यासपीठावर जी.एस. एस पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. देसाई, उपप्राचार्य प्रा. सचिन पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भरत शानभाग, कार्यक्रमाचे संचालक प्रा. अनिल खांडेकर , जनरल सेक्रेटरी कुमार निरंजन चिंचणीकर आणि विद्यार्थ्यीनी प्रतिनिधी तनिष्का विल्सन उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कु. महिमा रेवणकर हिच्या भरतनाट्यम नृत्याने आणि कु. पावनी ऐरसंग हिच्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला.

उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य एस एन देसाई यांनी केले ,प्रमुख पाहुणे प्रा ॲड. सरिता पाटील यांचे स्वागत मानचिन्ह (रोपटे) आणि पुष्पगुच्छ देऊन , अध्यक्ष श्री भरत शानभाग यांचा हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भरत शानभाग यांचे स्वागत प्रा. एस एन देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रा. ॲड सरिता पाटील यांनी आपले मौलिक विचार व्यक्त करतेवेळी एस के ई सोसाइटी आणि जी एस एस काॅलेजचे सदस्य व प्राध्यापक यांचे अभिनंदन केले कि आजच्या स्पर्धात्मक युगात अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करणे गरजेचे आहे, अभ्यासाव्यतरिक्त विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना उजाळा देण्याची संधी प्राप्त होते आणि आज हे सुप्त कार्य येथे संपन्न होत आहे. पुढील दोन दिवस विद्यार्थी आणि शिक्षक यांचे श्रम यशाच्या आणि ज्ञानाच्या नव निर्माणाची साक्ष देणार ,येथे सहभागी झालेला विद्यार्थी आणि शिक्षकांचा समुह एक नवी प्रेरणा आज देत आहेत, आपण आज जे कांही करणार किंवा पहाणार याचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यास भविष्य निर्माणासाठी नकी होणार अशे उद्गार व्यक्त करत प्रत्येक विद्यार्थ्यास वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संचालक प्रा. अनिल खांडेकर यांनी वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची संकल्पना आणि त्याचे स्वरूप यांची सविस्तर माहिती दिली ,
जनरल सेक्रेटरी निरंजन चिंचणीकर यांनी “रेजोनन्स” या शब्दाची फोड करून सांगितली.

अध्यक्षीय समारोप श्री भरत शानबाग यांनी केला. अध्यक्षीय भाषणात यांनी आमच्या संस्थेने समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्याचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी सहकार्य केले आहे आणि हे सुप्त कार्य चालत रहाणार याचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावा असे अवहान केले आणि शुभेच्छा दिल्या

आजच्या महोत्सवाच्या प्रमुख पाहुण्या आणि अध्यक्ष यांचा परिचय प्रा रेश्मा सपले यांनी करून दिला
उपस्थितांचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सचिन पवार यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कुमारी जोया इनामदार आणि कुमार सोहम शहापूरकर यांनी केले.

आयोजीत कार्यक्रमास बहुसंख्येने शालेय विद्यार्थ्यानी सहभाग घेतला आहे, या दोन दिवशीय महोत्सवात 18 (अठरा) स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
या पूर्ण महोत्सवाचे वैशिष्ट्य, पूर्ण नियोजन आणि रुपरेखा विद्यार्थीवर्गाने स्वप्रयत्नाने आखली आहे.
या उद्घाटन सोहळ्यास विविध शालेय शिक्षक विद्यार्थी आणि जी एस एस पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.