Spread the love

संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेसह म.ए. समितीचे शिष्टमंडळ व कार्यकर्ते नागपूरकडे रवाना

बेळगाव – एका बाजूला बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, दुसऱ्या बाजूला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू झाले आहे. महायुतीच्या सरकारकडून बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वतीने मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले आहेत. नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सीमा प्रश्नाला चालना मिळावी या अधिवेशनात बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांच्या ज्वलंत समस्येवर चर्चा केली जावी या संदर्भात मय समितीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह विरोधी पक्षातील मान्यवर नेत्यांच्या भेटी घेऊन सीमा प्रश्नसंदर्भात चर्चा करणार आहेत.

आज बेळगावातून रणजीत चव्हाण पाटील रमाकांत कोंडुसकर माजी उपमापूर संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू बिरजे,प्राचार्य आनंद आपटेकर,सागर पाटील,कपिल भोसले,प्रशांत भातखांडे,विजय कणबरकर,ज्ञानेश्वर मनोरकर,नारायण गोमानाचे महेंद्र मोदगेकर,अभय कदम ज्योतिबा पालेकर,उदय पाटील,विराज मुरकुंबी,गजानन पवार,योगेश आवड,सुमित पाटील,बाळू केरवाडकर,मोहन पाटील,आनंद पाटील,अमित जाधव,बाळू जोशी प्रकाश भेकणे,शिवराज सावंत संजय चौगुले,आनंद पाटील रुपेश कलखांबकर दर्शन सांगावकर अनंत कुचेकर,संतोष पोटे
विनायक बिरजे,विजय भोसले,राजू तलवार प्रीतम पाटील,सतीश पाटील येळूर प्रमोद पाटील एन डी पाटील
विनोद लोहार सतीश पाटील यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते आज सोमवारी नागपूरकडे रवाना झाले आहेत.