मुके देवफोटो संकलन करून शास्त्रोक्त विसर्जन; सर्व लोकसेवा फाउंडेशनचा आदर्श उपक्रम

न्यूज :
बेळगाव : हिंदू धर्मात देवतांना अत्यंत पवित्र स्थान दिले जाते. मात्र पूजेनंतर मुके झालेले देवांचे फोटो अनेकदा गटाराजवळ, रस्त्याच्या कडेला किंवा झाडांच्या खाली ठेवले जातात. हे देवतांचा अपमान ठरतो, याची जाणीव समाजाला करून देत सर्व लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष विरेश बसय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यात एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला आहे.
मंगळवारी बेळगाव तालुक्यातील वेंगुर्ला, अंबेवाडी, मार्कंडेय्य परिसरातील गणेश मंदिर व आसपासच्या भागात झाडांच्या खाली ठेवलेले हजारो हिंदू देवतांचे फोटो संकलित करून त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे नागरिकांना योग्य धार्मिक पद्धतींचे मार्गदर्शनही करण्यात आले.
यावेळी बोलताना विरेश बसय्या हिरेमठ म्हणाले की, समाजातील सर्व घटक देवांची पूजा करतात, मात्र हिंदू समाजात देवतांच्या फोटोंचे प्रमाण अधिक आहे. पूजेनंतर हे फोटो झाडाखाली ठेवणे म्हणजे देवतांचा अपमान होय. अशा फोटोंचे योग्य पद्धतीने विसर्जन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात रवी कोकित्कर, संतोष, देवप्पा कांबळे, सूरज तोरवाट, नागेश शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. हा उपक्रम संपूर्ण बेळगाव जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरत असून नागरिकांतून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
मुके देवफोटो संकलन करून शास्त्रोक्त विसर्जन; सर्व लोकसेवा फाउंडेशनचा आदर्श उपक्रम
Related Posts
जीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न
Spread the loveजीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असा महान संदेश देणारे थोर समाज सुधारक सदगुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र…
किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात*
Spread the love*किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात* महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी अस्मिता व सीमाप्रश्नी जागृतीसाठी बेळगावसह सीमाभागात मराठी सन्मान यात्रेची घोषणा युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष…
