मुके देवफोटो संकलन करून शास्त्रोक्त विसर्जन; सर्व लोकसेवा फाउंडेशनचा आदर्श उपक्रम

न्यूज :
बेळगाव : हिंदू धर्मात देवतांना अत्यंत पवित्र स्थान दिले जाते. मात्र पूजेनंतर मुके झालेले देवांचे फोटो अनेकदा गटाराजवळ, रस्त्याच्या कडेला किंवा झाडांच्या खाली ठेवले जातात. हे देवतांचा अपमान ठरतो, याची जाणीव समाजाला करून देत सर्व लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष विरेश बसय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यात एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला आहे.
मंगळवारी बेळगाव तालुक्यातील वेंगुर्ला, अंबेवाडी, मार्कंडेय्य परिसरातील गणेश मंदिर व आसपासच्या भागात झाडांच्या खाली ठेवलेले हजारो हिंदू देवतांचे फोटो संकलित करून त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे नागरिकांना योग्य धार्मिक पद्धतींचे मार्गदर्शनही करण्यात आले.
यावेळी बोलताना विरेश बसय्या हिरेमठ म्हणाले की, समाजातील सर्व घटक देवांची पूजा करतात, मात्र हिंदू समाजात देवतांच्या फोटोंचे प्रमाण अधिक आहे. पूजेनंतर हे फोटो झाडाखाली ठेवणे म्हणजे देवतांचा अपमान होय. अशा फोटोंचे योग्य पद्धतीने विसर्जन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात रवी कोकित्कर, संतोष, देवप्पा कांबळे, सूरज तोरवाट, नागेश शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. हा उपक्रम संपूर्ण बेळगाव जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरत असून नागरिकांतून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
मुके देवफोटो संकलन करून शास्त्रोक्त विसर्जन; सर्व लोकसेवा फाउंडेशनचा आदर्श उपक्रम
Related Posts
सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ; जागतिक विक्रमवीर श्रीश चव्हाणचा विशेष सत्कार
Spread the love सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ; जागतिक विक्रमवीर श्रीश चव्हाणचा विशेष सत्कार बेळगाव : येथील सेंट पॉल्स हायस्कूल, कॅम्प येथे शुक्रवारी (१३ जून) आंतरगृह क्रीडा स्पर्धा तसेच…
सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ; जागतिक विक्रमवीर श्रीश चव्हाणचा विशेष सत्कार
Spread the loveबेळगाव : येथील सेंट पॉल्स हायस्कूल, कॅम्प येथे शुक्रवारी (१३ जून) आंतरगृह क्रीडा स्पर्धा तसेच सहशालेय उपक्रम क्लबच्या उद्घाटन समारंभाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला…
