Spread the love

बेळगाव जिल्हा क्रीडाभारती बैठक उत्साहात.

  • बेळगाव ता,14. गुडशेडरोड येथील विमल फाउंडेशनच्या सभागृहात बेळगाव जिल्हा क्रीडाभारती संघटनेची बैठक उत्साहात पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यसचिव अशोक शिंत्रे, विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव ,राघवेंद्र कागवाड उपस्थित होते.
    प्रारंभी कर्नाटक उत्तरप्रांत सहसचिव विश्वास पवार यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.
    यानंतर किरण जाधव व अशोक शिंत्रे यांनी आगामी 13 14 15 फेब्रुवारी बेळगांवात होणाऱ्या अखिल भारतीय क्रीडा भारती नियामक सर्वसाधारण बैठकीबाबत आपले मनोगत व्यक्त केले, या बैठकीला अखिल भारतीय राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी बेळगावात तीन दिवस येणार असून या बैठकीत विविध विषयावरती सखोल चर्चा होणार आहे, ही बैठक यशस्वी पार पडण्यासाठी बेळगाव जिल्हा क्रीडाभारती पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले आहे,या बैठकीला मिस्टर इंडिया सुनील आपटेकर ,गुरुदत्त कुलकर्णी, मोहन पत्तार, आर पी वंटगुडी ,उमेश कुलकर्णी, नामदेव मिरजकर ,जयसिंग धनाजी, उमेश बेळगुंदकर, चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट, आदी सदस्य उपस्थित होते.