*कोल्हापूर मधील स्केटिंग स्पर्धेत* *बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी*

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स कोल्हापूर मधील सचिन टीम टॉपर्स स्केटिंग अकॅडमी तर्फे आयोजित शिवसमर्थ खुल्या स्पीड स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धे मध्ये 300 च्या वर टॉप स्केटिंग पटू सहभाग घेतला होता या स्पर्धा कोल्हापूर येथे पार पडल्या.या स्पर्धेत बेळगांव च्या स्केटर्स नी चमकदार कामगिरी करत 7 सुवर्ण, 4 रौप्य व 1कांस्य अशी एकूण 12 पदके जिंकली
*पदक विजेते स्केटर्स खालील प्रमाणे*
जानवी तेंडूलकर 2 सुवर्ण, शल्य तरळेकर 2 सुवर्ण, अमिषा वेर्णेकर 2 रौप्य,आरशान माडीवाले 1 सुवर्ण,1 कांस्य, सौरभ साळोखे 2 सुवर्ण, प्रीतम बागेवाडी 2 रौप्य
वरील सर्व स्केटर्स के एल ई सोसायटी स्केटिंग रिंक व गुड शेफर्ड स्केटिंग रिंक वर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून या सर्वांना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर,याचे प्रोत्साहन मिळत आहे
