शिवसृष्टी रस्ता प्रकरणी महापालिकेला हायकोर्टाचा दणका; २.१८ कोटींची भरपाई देण्याचे आदेश

बेळगाव: शहापूर येथील शिवसृष्टी समोरील रस्त्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्याबाबत उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने बेळगाव महानगरपालिकेला जोरदार झटका दिला आहे. या प्रकरणी जमीनमालक गर्गट्टी कुटुंबाला २.१८ कोटी रुपयांची भरपाई देण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले असून, दोन आठवड्यांत कार्यवाही पूर्ण करून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
शिवसृष्टी रस्ता प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. रस्त्यासाठी वापरण्यात आलेल्या जमिनीबद्दल योग्य मोबदला न मिळाल्याने संबंधित कुटुंबाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या प्रकरणी यापूर्वीही न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत स्मार्ट सिटी योजनेच्या व्यवस्थापकीय संचालकांवर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता, तसेच जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.
नंतर झालेल्या सुनावणीत स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका कविता वारंगल न्यायालयात हजर राहिल्या. त्यांनी शासन निर्णयाच्या आधारे शिवसृष्टी समोरील रस्ता अधिकृतपणे बेळगाव महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्याची माहिती दिली. यानंतर न्यायालयाने नुकसान भरपाईची संपूर्ण जबाबदारी स्मार्ट सिटीऐवजी महानगरपालिकेवर निश्चित केली.
विशेष म्हणजे, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी न्यायालयाने सुरुवातीला १७.९९ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र, जबाबदारी स्पष्ट झाल्यानंतर आणि सुधारित उत्तरदायित्व लक्षात घेता, ही रक्कम आता थेट २.१८ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
सध्या हा रस्ता बंद असून तो पुन्हा खुला करण्यासाठी हालचाली सुरू असतानाच न्यायालयाचा हा आदेश आल्याने महानगरपालिकेपुढे आर्थिक आणि प्रशासकीय आव्हान उभे राहिले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता तातडीने निर्णय घेऊन भरपाई अदा करणे महापालिकेला बंधनकारक ठरणार आहे.
शिवसृष्टी रस्ता प्रकरणी महापालिकेला हायकोर्टाचा दणका; २.१८ कोटींची भरपाई देण्याचे आदेश
Related Posts
जीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न
Spread the loveजीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असा महान संदेश देणारे थोर समाज सुधारक सदगुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र…
किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात*
Spread the love*किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात* महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी अस्मिता व सीमाप्रश्नी जागृतीसाठी बेळगावसह सीमाभागात मराठी सन्मान यात्रेची घोषणा युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष…
