*येळळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात*
येळळूर, ता. 23: येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डी.जी. पाटील होते. सोसायटीचे चेअरमन डी.जी. पाटील व व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. तर नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे, संचालक प्रा.सी.एम गोरल व रवींद्र गिंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना चेअरमन डी.जी. पाटील म्हणाले, गेल्या 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 साली आम्ही नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना स्वातंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून केली. सोसायटीला आज 25 वर्षे पूर्ण होत आहेत. संस्था दिवसेंदिवस प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडत आहे. संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार व हितचिंतक तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे व झोकून देऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्थेने अल्पावधीतच गरुड झेप घेत, येळळूर व परिसरात आपला नावलौकिक मिळवला आहे. वडगाव व येळळूर येथे स्वतःच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर परमेश्वर नगर येळळूर येथे नेताजी मराठी सांस्कृतिक भवनाची उभारणी करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनीही संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संचालक बि. डी. छत्र्यान्नावर, संजय मजुकर, सी.एम.उघाडे, परशराम गिंडे, शंकर मुरकुटे, पांडुरंग घाडी, अनिल मुरकुटे, डॉ. कुलदीप लाड, सेक्रेटरी दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे, विजय धामणेकर, रवि कणबरकर, कांचन पाटील, ज्योती यरमाळकर,सोनाली सायनेकर,
संगीता दणकारे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सी एम गोरल यांनी केले. तर आभार दीपक हट्टीकर यांनी मानले.
फोटो वृत्त -येळळूर: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करताना चेअरमन डी. जी.पाटील समवेत रघुनाथ मुरकुटे, प्रा. सी.एम. गोरल, रवींद्र गिंडे, किरण गिंडे, शंकर मुरकुटे, पांडुरंग घाडी, अनिल मुरकुटे व इतर
येळळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात*
Related Posts
मराठा समाजाला राजकीय ठोकर दिल्यास चोख उत्तर – श्री मंजुनाथ भारती स्वामीजी
Spread the loveमराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संघटनात्मक शक्ती असून, समाजाला राजकीयदृष्ट्या पोखरण्याचा प्रयत्न कोणीही केला तर त्याला चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा मराठा समाजाचे गुरु…
आबा व हिंद स्पोर्ट्स क्लब तर्फे भव्य जलतरण स्पर्धांचे आयोजन*
Spread the love*आबा व हिंद स्पोर्ट्स क्लब तर्फे भव्य जलतरण स्पर्धांचे आयोजन* शनिवार दिनांक सात व रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी गोवावेस महानगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये तिसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य निमंत्रितांच्या जलतरण…
