तारांगण, साई प्रतिष्ठान व सुमन क्लिनिक यांच्या वतीने ६ वे कवयित्री संमेलन शनिवारी
तारांगण, साई प्रतिष्ठान व सुमन क्लिनिक यांच्या वतीने ६ वे कवयित्री संमेलन हळदी कुंकू समारंभ शनिवार दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी तीन वाजता शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या डॉ. शकुंतला गिजरे सभागृहामध्ये आयोजित केलेले आहे. या कवयीत्री संमेलनाच्या निमित्ताने बेळगाव सीमा भागातील कवयित्रींना कविता सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळत आहे. कवयीत्री संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा डॉ. शोभा नाईक या आहेत. संमेलनाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. दत्तप्रसाद गिजरे , पुणे येथील उद्योजक पिटर डिसूजा, डॉ. स्मिता वडेर, साई प्रतिष्ठान बेळगाव शाखेच्या अध्यक्षा अस्मिता आळतेकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सत्कार समारंभ ही आयोजित केलेला आहे. ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे सचिव शिवाजीराव जळगेकर एमटेक परीक्षेत सिम्बॉयसिस कॉलेजमधून सुवर्ण पद विजेते, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सीमा कवी रवींद्र पाटील, वेदांत फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री पाटील, सीईटी परीक्षा उत्तीर्ण समृद्धी पाटील, सीए परीक्षा उत्तीर्ण नेहा आळतेकर , सी आर पी एफ पोलिस सेवेत निवड झाल्याबद्दल अक्षता पाटील,साहिल पाटील सी.आय.एस.एफ पोलिस सेवेत निवड झालेबद्दल तन्वी पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महिलांसह साहित्यप्रेमी वाचकांनी उपस्थित रहावे असे आयोजकांनी कळवले आहे
