जनसेवाच देवसेवा; लोकांच्या सेवेतच आयुष्य घालवले – लक्ष्मी हेब्बाळकर
![]()
![]()
बेळगाव : “बसवण्णांच्या कायकवे कैलास या विचारावर विश्वास ठेवून जनसेवेलाच देवसेवा मानत मी गेली २५ वर्षे लोकांच्या सेवेत कार्य करत आहे,” असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
मुतगा येथे आयोजित श्री ग्रंथराज सांप्रदायिक पारायण सोहळ्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, शेतकरी कुटुंबातून येऊन सरकारी शाळेत शिक्षण घेतले आणि समाजसेवेच्या बळावर आज या स्थानापर्यंत पोहोचले.
भारतीय संस्कृती महान असून पालकांनी मुलांना इतिहास आणि महान व्यक्तींची माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच गेल्या सात वर्षांत मतदारसंघातील १५४ मंदिरांचे जीर्णोद्धार केल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात साध्वी रुक्मिणीताई हावरे यांचे पारायण झाले. यावेळी चैतन चौगुले, सचिन पाटील, शिवाजी पाटील यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनसेवाच देवसेवा; लोकांच्या सेवेतच आयुष्य घालवले – लक्ष्मी हेब्बाळकर
Related Posts
“फिट इंडिया दूत रणजितसिंग राजपूत यांची शांताई वृद्धाश्रमाला भेट; ज्येष्ठांशी संवादातून आनंदाचा क्षण”
Spread the love फिट इंडिया अॅम्बेसेडर आणि भारत सरकारचे राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रणजितसिंग राजपूत यांनी आज शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट देत तेथील ज्येष्ठ नागरिकांसोबत मनमोकळा संवाद साधला. या भेटीत…
“शिवराय ते भीमराव: तुडये येथे आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार”
Spread the loveभीमस्वराज्य युवक मंडळ तुडये यांच्या वतीने विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संस्कृतीक कार्यक्रम आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमचा कार्यक्रमाच्या उदघाटणासाठी…


