जनसेवाच देवसेवा; लोकांच्या सेवेतच आयुष्य घालवले – लक्ष्मी हेब्बाळकर
![]()
![]()
बेळगाव : “बसवण्णांच्या कायकवे कैलास या विचारावर विश्वास ठेवून जनसेवेलाच देवसेवा मानत मी गेली २५ वर्षे लोकांच्या सेवेत कार्य करत आहे,” असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
मुतगा येथे आयोजित श्री ग्रंथराज सांप्रदायिक पारायण सोहळ्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, शेतकरी कुटुंबातून येऊन सरकारी शाळेत शिक्षण घेतले आणि समाजसेवेच्या बळावर आज या स्थानापर्यंत पोहोचले.
भारतीय संस्कृती महान असून पालकांनी मुलांना इतिहास आणि महान व्यक्तींची माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच गेल्या सात वर्षांत मतदारसंघातील १५४ मंदिरांचे जीर्णोद्धार केल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात साध्वी रुक्मिणीताई हावरे यांचे पारायण झाले. यावेळी चैतन चौगुले, सचिन पाटील, शिवाजी पाटील यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनसेवाच देवसेवा; लोकांच्या सेवेतच आयुष्य घालवले – लक्ष्मी हेब्बाळकर
Related Posts
भरधाव दुचाकीची धडक; एम. के. हुबळीतील 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
Spread the loveकित्तूर : भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एम. के. हुबळी येथील 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव…
आरसीबीच्या विजयाचा जल्लोष पाहायला निघालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; बुलेट दुचाकी डिव्हायडरवर आदळली
Spread the loveबैलहोंगल शहरात आरसीबीच्या आयपीएल विजयानंतरचा जल्लोष पाहण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विनायक अनिल रायर (वय 23, रा. बसवनगर, 4 था…


