बेलगाव : भारत नगर येथील लंबोदर श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा होतकरू व प्रामाणिक कार्यकर्ता शिवा लोहार (वय ३२, रा. नवी गल्ली) याच्यावर सुतळी बॉम्ब फुटल्याने गंभीर अपघात घडला असून त्याचे दोन्ही डोळे निकामी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होळी उत्सव २०२६ च्या तयारीसाठी शिवा लोहार भारत नगर येथे आला होता. भारत-वेस्ट इंडीज क्रिकेट सामन्यात भारताचा विजय झाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी अल्प प्रमाणात वैयक्तिक खर्चातून आतिषबाजी करण्यात येत होती. यावेळी सुतळी बॉम्ब लावत असताना अचानक स्फोट होऊन हा अपघात घडला.
या दुर्घटनेत शिवा लोहार याच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर बेलगाव येथील डॉ. प्रभाकर कोरे (KLE) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक उपचारासाठी सुमारे ३० ते ४० हजार रुपये खर्च झाला असून तो मंडळातील कार्यकर्त्यांनी वैयक्तिक मदत म्हणून उचलला आहे.
शिवा लोहार हा गेल्या ४-५ वर्षांपासून भारत नगरमधील सर्व सण-उत्सवांमध्ये मनापासून सेवा देत होता. त्याच्या कुटुंबात वृद्ध आई सोडून दुसरा कर्ता पुरुष नसून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.
शिवाच्या पुढील आयुष्यासाठी डोळ्यांचे प्रत्यारोपण करून दृष्टी मिळवून देण्यासाठी मंडळ व कार्यकर्ते प्रयत्नशील असून यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


सुतळी बॉम्ब स्फोटात शिवा लोहारचे दोन्ही डोळे गेले; मदतीसाठी समाजाला भावनिक आवाहन
Related Posts
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन
Spread the love*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन सालाबाद प्रमाणे मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेऊन मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र…
सावगाव मराठी शाळेत कन्नड शाळेला विरोध; ग्रामस्थांच्या भूमिकेनंतर पर्यायी जागेचा निर्णय
Spread the love सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नडी शाळा सुरू करण्याचा घाट घालण्यात आला यामुळे संपूर्ण मराठी भाषिकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना मोठ्या संख्येने…
