कागवाड: कागवाड-शिरगुप्पी मार्गावर एनडब्ल्यूकेएसआरटीसी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 10.20 वाजण्याच्या सुमारास कागवाड हद्दीतील कागवाड-शिरगुप्पी रस्त्यावर हा अपघात झाला. केए-23/एफ-1256 क्रमांकाची एनडब्ल्यूकेएसआरटीसी बस अथणी डेपोचा चालक संगप्पा नेजप्पा गणी (रा. मनगोळी) हा कागवाडहून शिरगुप्पीकडे जात असताना भरधाव व निष्काळजीपणे बस चालवत होता. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याने जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे.
या अपघातात विठ्ठल बसप्पा अक्कीमरडी (वय 50, रा. निडगुंदी, ता. रायबाग) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर कागवाड पोलिस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा क्रमांक 156/2026 अंतर्गत बीएनएस 2023 कलम 281 व 106(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या अपघातामुळे निडगुंदी गावात शोककळा पसरली असून अक्कीमरडी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिरगुप्पीजवळ भीषण अपघात; एनडब्ल्यूकेएसआरटीसी बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
Related Posts
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन
Spread the love*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन सालाबाद प्रमाणे मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेऊन मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र…
सावगाव मराठी शाळेत कन्नड शाळेला विरोध; ग्रामस्थांच्या भूमिकेनंतर पर्यायी जागेचा निर्णय
Spread the love सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नडी शाळा सुरू करण्याचा घाट घालण्यात आला यामुळे संपूर्ण मराठी भाषिकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना मोठ्या संख्येने…
