हुक्केरी: हत्तरगी टोलनाक्याजवळ केएसआरटीसी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी यमकनमर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजता हत्तरगी गाव हद्दीतील टोलनाक्याच्या दक्षिण बाजूस हा अपघात घडला. केए-23/एफ-0871 क्रमांकाच्या केएसआरटीसी बसचा चालक मुत्यप्पा बेनाळे हा बस भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता. टोलनाक्यासमोरील रस्त्याच्या मध्यभागी असलेले सिमेंट बॅरिकेड्स ओलांडून त्याने बस अचानक हत्तरगी बसस्थानकाच्या दिशेने वळवली. यावेळी संकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीकडे दुर्लक्ष झाल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसली.
या अपघातात काशीनाथ पांडुरंग गंभीर (वय 47, रा. दादबानहट्टी, ता. हुक्केरी) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, चेहऱ्याला तसेच डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर बेळगाव येथील विजया रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना 3 जून रोजी प
हाटे 1.58 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
मृताच्या पत्नी सरोजनी काशीनाथ गंभीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यमकनमर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 173/2026 अंतर्गत बीएनएस कलम 281 व 106(1) नुसार बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे दादबानहट्टी परिसरात हळहळ व्यक्त होत असून गंभीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हत्तरगी टोलनाक्यावर केएसआरटीसी बसची दुचाकीला धडक; उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू
Related Posts
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन
Spread the love*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन सालाबाद प्रमाणे मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेऊन मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र…
सावगाव मराठी शाळेत कन्नड शाळेला विरोध; ग्रामस्थांच्या भूमिकेनंतर पर्यायी जागेचा निर्णय
Spread the love सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नडी शाळा सुरू करण्याचा घाट घालण्यात आला यामुळे संपूर्ण मराठी भाषिकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना मोठ्या संख्येने…
