कागवाड: कागवाड-शेडबाळ मार्गावरील दुर्गा ढाबा परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवारी (दि. 2 जून 2026) दुपारी सुमारे 12.10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुनाथ श्रीशैल कांबळे (रा. साईनगर, मुधोळ) हा आपल्या केए-35/बी-9441 क्रमांकाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारने शेडबाळहून कागवाडकडे जात होता. यावेळी त्याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत समोरील वाहनापासून सुरक्षित अंतर न राखता पुढे जाणाऱ्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
या अपघातात एमएच-10/एके-2070 क्रमांकाच्या हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीवरील महानंदा सचिन चौगुले (वय 38, रा. सावळी, ता. मिरज, जि. सांगली) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
तर दुचाकी चालक व त्यांचे पती सचिन रावसो चौगुले (वय 44) यांना डोके, छाती, कपाळ तसेच दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी कागवाड पोलिस ठाण्यात कार चालक मंजुनाथ कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 157/2026 नुसार बीएनएस 2023 कलम 281 आणि 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी अपघातामुळे चौगुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
कागवाडजवळ भीषण अपघात: कारची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी
Related Posts
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन
Spread the love*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन सालाबाद प्रमाणे मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेऊन मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र…
सावगाव मराठी शाळेत कन्नड शाळेला विरोध; ग्रामस्थांच्या भूमिकेनंतर पर्यायी जागेचा निर्णय
Spread the love सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नडी शाळा सुरू करण्याचा घाट घालण्यात आला यामुळे संपूर्ण मराठी भाषिकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना मोठ्या संख्येने…

