- ‘मराठी सन्मान यात्रे’ला अवचारहट्टीचा एकमुखी पाठिंबा


येळ्ळूर दि. 7- येत्या रविवार दि. 15 मार्च रोजी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या मराठी सन्मान यात्रेला अवचारहट्टी गावचा एकमुखी पाठिंबा व्यक्त करण्यात आला. येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या जागृती बैठकीत माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. धाकलू करविनकोप यांनी पाठिंबा जाहीर करून प्रचंड संख्येने सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केल
पुन्हा एकदा या लढ्याला नवी उभारी देण्यासाठी युवकांनी हा लढा आपल्या हातात घेतला आहे मराठी साठी आपण सर्वजन मराठी सन्मान यात्रेत सहभागी होऊन येळ्ळूर महाराष्ट्र चौकात होणाऱ्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभा यशस्वी करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी मराठी सन्मान यात्रे संबधी.सविस्तर माहिती विशद करून या मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले यावेळी दता उघाडे सीमा लढ्यावर सध्या चालू घडामोडींवर भाष्य करत मराठी संस्कृती साठी आपण संघटित होऊन येणाऱ्या काळात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून आपली संघटना मजबूत करुया असे सांगून येळ्ळूर येथे १५मार्च रोजी आयोजित केलेली सभा आणि मोटरसायकल रॅली यशस्वी करण्याचे आवाहन केले.माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मेलगे यांनी मराठी सन्मान यात्रेचे आवचारहट्टी गावात जंगी स्वागत करणार असल्याचे सांगितले आनंद तुळजाई यांनी गावातील सर्व युवा मनापासून सहभागी होऊन ही सन्मान यात्रा यशस्वी करणार आहोत ग्रामपंचायत सदस्य कल्लापा मेलगे, वामनराव पाटील, , दुद्दापा बागेवाडी, राजू पावले आदींची भाषणे झाली.जेष्ठ कार्यकर्ते मारुती तुळजाई यांनी युवकांनी घेतलेल्या या भूमिकेचे कौतुक करत आवचारहट्टी गावचा एकमुखी पाठिंबा जाहीर केला.आवचारहट्टी धरणातून मरण पावलेल्या नाना सळेभावी यांच्या घरी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन करण्यात आले
याप्रसंगी विठ्ठल कुरंगी, चांगाप्पा तुळजाई, आनंद तुळजाई, चांगाप्पा कुरंगी, चांगाप्पा तुळजाई, आनंद तुळजाई, विठ्ठल कुरंगी, सोमनाथ कुरंगी, सुरेश मेलगे, विलास यरमाळकर, विलास पाटील, सिद्धाप्पा कुरंगी, रामा मेलगे, कृष्णा मेलगे, विठ्ठल मेलगे, चांगदेव परीट,
बी.एन. मजुकर, कृष्णा शहापूरकर, यलुपा पाटील, दयानंद उघाडे, प्रकाश पाटील, शिवाजी कदम, सतीश देसुरकर, प्रकाश मालुचे, नेताजी गोरल, सुरज गोरल, राकेश परिट, श्रीकांत नांदूरकर इत्यादी समिती कार्यकर्ते हजर होते.
मराठी सन्मान यात्रे’ला अवचारहट्टीचा एकमुखी पाठिंबा
Related Posts
सुतळी बॉम्ब स्फोटात शिवा लोहारचे दोन्ही डोळे गेले; मदतीसाठी समाजाला भावनिक आवाहन
Spread the loveबेलगाव : भारत नगर येथील लंबोदर श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा होतकरू व प्रामाणिक कार्यकर्ता शिवा लोहार (वय ३२, रा. नवी गल्ली) याच्यावर सुतळी बॉम्ब फुटल्याने गंभीर अपघात…
सिद्धरामय्या सरकारचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या अपेक्षांवर अपुरा – डॉ. सोनाली सरनोबत
Spread the loveबेळगाव : कर्नाटक राज्याचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची टीका भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे.…
