Spread the love

जी एस एस पी यु काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावी वार्षिक परीक्षेत घवघवीत यश

सालाबादप्रमाणे या वर्षी ही जी एस एस पी यु काॅलेजचे विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने वार्षिक परीक्षेस सामोरी गेले आणि यश ही संपादन केले आहे. या वर्षी 93% टक्के निकाल प्राप्त केला आहे.

मागील काही वर्षापासून बारावी परीक्षेस बसणाय्रा विद्यार्थीची विशेष तयारी प्राचार्याच्या देखरेखीमध्ये विशेष शिक्षकांच्या समुहाद्वारे करून घेण्यात येत आहे, याचा फायदा विद्यार्थी वर्गाचे गुणांक वृध्दि होण्यासाठी फार होत आहे, या विशेष वर्गांसाठी विद्यार्थी आणि पालक यांचा प्रतिसाद ही चांगला मिळत आहे.
या कार्यात प्राध्यापक वर्गाचे ही मोलाचे योगदान आहे. या पूर्ण प्रक्रियेचा चांगला प्रभाव बारावीच्या निकाला (फलीतांश/रिजल्ट) मधून स्पष्ट होत आहे.
या वर्षी ही विद्यार्थी वर्गाने आपले ध्येय गाटून उत्तम प्रगती परिक्षेत दाखवली आहे,या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे एस के ई सोसाइटीचे अध्यक्ष डाॅ श्री किरणजी ठाकुर, उपाध्यक्ष श्री एस वाय प्रभू ,इतर सभासद, प्राचार्य, प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.
या सर्व विद्यार्थ्यास भाविभविष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या आहेत.