- बेळगावजवळील जयनगर-हुंचेनहट्टी परिसरात बुधवारी सायंकाळी एका तरुणाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
राहुल तिप्पाण्णा तळवार (वय 23, रा. तानाजी गल्ली, मजगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. राहुल हा बेळगावातील एका औषध दुकानात काम करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सुमारे 5.15 वाजण्याच्या सुमारास राहुलला रामेश्वरनगर परिसरात बोलावण्यात आले होते. आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादातून काही जणांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला असून त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी तसेच एसीपी गंगाधर बी. एम. यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते.
या प्रकरणात आठ ते दहा जणांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, गुरुवारी सकाळी राहुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी रुग्णालय परिसराला भेट देऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
मृत राहुलच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार असून या घटनेमुळे मजगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बेळगावात तरुणाची तलवारीने हत्या; आर्थिक वादातून हल्ल्याची शक्यता
Related Posts
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन
Spread the love*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन सालाबाद प्रमाणे मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेऊन मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र…
सावगाव मराठी शाळेत कन्नड शाळेला विरोध; ग्रामस्थांच्या भूमिकेनंतर पर्यायी जागेचा निर्णय
Spread the love सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नडी शाळा सुरू करण्याचा घाट घालण्यात आला यामुळे संपूर्ण मराठी भाषिकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना मोठ्या संख्येने…
