बेळगाव : शिवाजीनगर परिसरातील युवकांना आरोग्यदायी जीवनशैलीकडे प्रोत्साहन देण्यासाठी आमदार आसिफ (राजू)शेठ यांनी आपल्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या नव्या अत्याधुनिक जिमचे उद्घाटन केले. यावेळी युवा नेते अमान सैत हेही प्रमुख उपस्थित होते.
या जिममुळे परिसरातील युवक व नागरिकांना आधुनिक फिटनेस सुविधा उपलब्ध होणार असून नियमित व्यायाम, आरोग्य जनजागृती आणि सकारात्मक उपक्रमांना चालना मिळणार आहे. युवकांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावे तसेच आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आमदार शेठ यांनी सांगितले.
उद्घाटन प्रसंगी पंच मंडळ, युवक मंडळाचे पदाधिकारी, महिला काँग्रेस नेत्या मिनल चौगुले, मशिनरी आयोजक शाहिद, स्थानिक नेते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत, शिवाजीनगरमध्ये आधुनिक जिमची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे युवकांना मोठा फायदा होईल तसेच फिटनेस आणि सामुदायिक सहभाग वाढीस लागेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

शिवाजीनगरमध्ये आमदार आसिफ (राजू) शेठ यांच्या निधीतून आधुनिक जिमचे उद्घाटन
Related Posts
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन
Spread the love*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२६* *इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाठविण्याचे आवाहन सालाबाद प्रमाणे मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेऊन मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र…
सावगाव मराठी शाळेत कन्नड शाळेला विरोध; ग्रामस्थांच्या भूमिकेनंतर पर्यायी जागेचा निर्णय
Spread the love सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नडी शाळा सुरू करण्याचा घाट घालण्यात आला यामुळे संपूर्ण मराठी भाषिकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना मोठ्या संख्येने…
