Spread the love

स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीत विद्यार्थिनीचा गौरव
रेश्मा सोंटक्कीची गोवा येथील प्रतिष्ठित कंपनीत निवड
पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू; मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
“स्कायवर्ल्डमुळेच माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला” – विद्यार्थिनीची भावना
बेळगाव : स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमी, बेळगाव येथे गुरुवारी दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा विशेष सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बामणे तसेच श्री सरस्वती इन्फोटेकच्या व्यवस्थापकीय संचालिका ज्योती विनोद बामणे उपस्थित होत्या.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी अकॅडमीतील प्रशिक्षणामुळे झालेल्या सकारात्मक बदलांविषयी मनोगत व्यक्त केले. विशेषतः विद्यार्थिनी रेश्मा सोंटक्की हिने “स्कायवर्ल्ड अकॅडमीत प्रवेश घेताना माझ्याकडे आत्मविश्वास आणि अनुभव नव्हता. मात्र येथील प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे माझ्यात मोठा बदल झाला आणि आजच्या यशामागे स्कायवर्ल्डचा मोठा वाटा आहे,” असे सांगितले.
रेश्मा सोंटक्की हिची गोवा येथील ‘एनकॅल्म लाउंज’ या भारतातील नामांकित विमानतळ हॉस्पिटॅलिटी कंपनीत निवड झाल्याने अकॅडमीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तिच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
ग्रामीण व स्थानिक माध्यमातून शिक्षण घेतलेल्या आपल्या मुलीने एवढे मोठे यश संपादन केल्याचे पाहून पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे उपस्थितांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
प्रमुख पाहुणे विनोद बामणे यांनी निवड झालेल्या विद्यार्थिनी व तिच्या पालकांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्योती बामणे यांनीही विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, कौशल्य आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, असा प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीतर्फे सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेचे मार्गदर्शन असेच कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.