Spread the love

**रोलर स्केटिंग स्पर्धेचा बक्षीस समारंभ खेळा मध्ये…… जग जिंकण्याची ताकद*

जिल्हास्तरीय तसेच क्लब पातळीवर झालेल्या विविध ठिकाणी झालेल्या स्केटिंग स्पर्धेचा बक्षीस समारंभ नुकताच शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंकवर पार पडला. ह्या बक्षीस समारंभला प्रमुख पाहुणे म्हणून शिवगंगा स्केटिंग क्लब च्या अध्यक्षा सौ ज्योती चिंडक व स्केट पार्क चे अध्यक्ष अशोक गोरे उपस्थित होते यांच्या शुभ हस्ते विजेत्या सर्व स्पर्धकांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सौ ज्योती चिंडक यांनी सर्व स्केटर्स ना स्केटिंग विषयी व आरोग्य विषयी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या श्री अशोक गोरे यांनी बेळगांव तील सर्व स्केटर्स ना प्रोत्साहन देऊन सर्वपरी मदत करू असे आश्वासन दिले यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी पालक व स्केटर्सना शिस्त बद्द खेळाबदल व आपली जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले या बक्षीस समारंभला आंतरराष्ट्रीय स्केटिंग पटू निखिल चिंडक, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गंगणे, सोहम हिंडलगेकर, ऋषिकेश पसारे, श्री रोकडे, मिसेस महात, कृष्ण कन्हैया होसमनी, विनायक पाटील,बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते