येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने
वकिलांचा जाहीर सत्कार

येळ्ळूर दि. 17- येळ्ळूरमधील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट उसळली. मराठी भाषीकांच्या हृदयावर घाव घालून न थांबता कर्नाटकी पोलिसांनी येळ्ळूरच्या निष्पाप जनतेवर वेगवेगळे सात गुन्हे दाखल केले. मात्र न्यायदेवतेने येळ्ळूरवासियांना साथ देवून सर्वांची निर्दोष मुक्तता केली. तब्बल 12 वर्षे हा न्यायालयीन लढा सुरू होता. बचाव पक्षाला न्यायालयाचे हेलपाटे मारावे लागत होते. पण बचावकर्त्यांचे वकील अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड शाम पाटील, अॅड. हेमराज बेंचण्णावर आदि वकील येळ्ळूरवासियांच्या पाठिशी राहून त्यांनी जबरदस्त व्यक्तिवाद केला. त्यामुळेच या सात खटल्यातून जवळपास 250 जणांची निर्दोष मुक्तता झाली. या वकिलांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड शाम पाटील, अॅड. हेमराज बेंचण्णावर….आदि वकिलांचा सत्कार येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र कुस्ती मैदानाच्यावतीने दुद्दापा बागेवाडी, प्रकाश अष्टेकर, दत्ता उघाडे, राजू पावले, अजित गोरल, भोला पाखरे, सतीश कुगजी…..यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
सदर न्यायालयीन खटला चालविण्यासाठी माजी जि.प. सदस्य अर्जुनराव गोरल, शिवाजी कदम, उदय जाधव, सतीश कुगजी, शामल जाधव, कमळा पोटे, रमेश धामणेकर, ….आदिनी महत्वपूर्ण योगदान दिले.
या सत्कारप्रसंगी रमाकांत कोंडुसकर, प्रमोद पाटील, तानाजी हलगेकर, आनंद कुंडेकर, जोतीबा चौगुले, सुरज गोरल, मधु पाटील इतर मान्यवर हजर होते
येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार
Related Posts
भरधाव दुचाकीची धडक; एम. के. हुबळीतील 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
Spread the loveकित्तूर : भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एम. के. हुबळी येथील 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव…
आरसीबीच्या विजयाचा जल्लोष पाहायला निघालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; बुलेट दुचाकी डिव्हायडरवर आदळली
Spread the loveबैलहोंगल शहरात आरसीबीच्या आयपीएल विजयानंतरचा जल्लोष पाहण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विनायक अनिल रायर (वय 23, रा. बसवनगर, 4 था…
