शाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी

न्यूज:
बेळगावातील शाहापूर परिसरात शिवसंस्कृतीचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने शिवकालीन युद्धकलेचा भव्य आणि थरारक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. धर्मवीर श्री संभाजी युवक मंडळ व श्री शिवनेरी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता गाडामार्ग, बिचू गल्लीत हा कार्यक्रम रंगणार आहे.
या कार्यक्रमात पारंपरिक शस्त्रकला, मर्दानी खेळ आणि शिवकालीन पराक्रमाचे जिवंत सादरीकरण करण्यात येणार असून, उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने सायंकाळी ८:३० वाजता महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
आयोजकांनी नागरिकांना कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक व प्रेरणादायी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
शाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी
Related Posts
भरधाव दुचाकीची धडक; एम. के. हुबळीतील 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
Spread the loveकित्तूर : भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एम. के. हुबळी येथील 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव…
आरसीबीच्या विजयाचा जल्लोष पाहायला निघालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; बुलेट दुचाकी डिव्हायडरवर आदळली
Spread the loveबैलहोंगल शहरात आरसीबीच्या आयपीएल विजयानंतरचा जल्लोष पाहण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विनायक अनिल रायर (वय 23, रा. बसवनगर, 4 था…
