बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर येथे २०१४ साली घडलेल्या ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक प्रकरणातील सर्व सात खटल्यांचा शेवट अखेर झाला असून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल दहा वर्षे चाललेल्या या कायदेशीर लढाईत ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
२७ जुलै २०१४ रोजी फलक हटविल्यानंतर पोलिसांनी सात गुन्हे दाखल केले होते. यापूर्वी पाच खटल्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटले होते, तर उर्वरित दोन खटल्यांचाही निकाल आता ग्रामस्थांच्या बाजूने लागला आहे.
या प्रकरणात अनेक निरपराध ग्रामस्थांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. पोलिसांच्या कारवाईनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र न्यायालयाच्या निकालामुळे सर्व आरोपी निर्दोष ठरले असून, मराठी भाषिकांच्या एकजुटीचा विजय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
या दीर्घ लढ्यात काही जणांचे निधन झाले, तर काही आरोपींची नावे अनुपस्थितीमुळे वगळण्यात आली. या प्रकरणात वकिलांनी सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला.

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; 10 वर्षांची लढाई संपली
Related Posts
रायगड जिल्ह्यातून सीमावाद मोहिमेला बळ; पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Spread the love रायगड जिल्ह्यातून सीमावाद मोहिमेला बळ; पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव सीमावादाच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला रायगड जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळू लागला…
निलजी मराठी शाळेचा शतक महोत्सव १२-१३ एप्रिलला; दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
Spread the loveबेळगाव तालुक्यातील निलजी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा शतक महोत्सव १२ व १३ एप्रिल २०२६ रोजी दोन दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. १९२६ साली…
