बे
ळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन प्रमुख अतिथी भाग्यश्री कदम व सोनाली कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संयोजक श्री शंकर चौगुले सर होते यावेळी व्यासपीठावर प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक एस. एन. जाधव, नीता यल्लारी, धनश्री सांगावकर, दीपमाला घाडी यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते कुसुमाग्रज व सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन कराण्यात आले. त्यानंतर आरोही झंगरूचे, आदित्य देवाण, स्वरा पाटील,कन्हैया भाटे, वीरा भाटे, श्रीशा मोहिते, श्रीनाथ झंगरूचे, अथर्व पाटील अथर्व कुन्नूरकर या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली आदिती पाटील, मानवी जाधव, सपना तारीहाळकर ह्या विद्यार्थिनींनी स्वरचित कविता सादर केल्या. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त समाज सुधारकांच्या वेशभूषा सादर केल्या तर इयत्ता चौथी पासून नवीन पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त वेगवेगळ्या प्रयोगांचे सादरी करण करून वाहवा मिळविली त्यानंतर इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या नृत्याने कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अबोली चौगुले या विद्यार्थिनीने तर आभार संगीता सुतार या विद्यार्थिनीने मानले.
