बेळगाव:
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज सोमवारी सकाळी जिल्हा निवडणूक निर्वाचनाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आपले नामांकन पत्र सादर केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत माजी मंत्री रमेश जारकीहोळी, खासदार मंगला अंगडी, माजी आमदार अनिल बेनके आणि विधान परिषद सदस्य हणमंत निराणी उपस्थित होते. दरम्यान, गेल्या शुक्रवारपासून नामांकन पत्र अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र शनिवार व रविवारी सरकारी सुट्टी असल्याने आज सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या कामास वेग येणार आहे.