Spread the love

बेळगाव:

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. यादरम्यान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, बागण्णा नरोटी माजी डीसीएम लक्ष्मण सौदी उपस्थित होते.

यानंतर विविध भागातील काँग्रेस कार्यकर्ते व युवा कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला बेळगाव शहरातील सीपीएड मैदान पासून या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आले ढोल ताशाच्या गजरात या शक्ती प्रदर्शन मिरवणुकीला विविध भागातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते , मिरवणूक प्रारंभ होताच मध्यभागी सजवलेल्या वाहनांमध्ये मंत्री सतीश जारकीहोळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर विधान परिषद सदस्य चनराज हट्टीहोळी व मध्यभागी उमेदवार मृणाल हेब्बाळकर होते, तसेच बुडाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे विनय नावलगट्टी प्रमुख नेते या वाहनांमध्ये थांबून मतदारांना हात उंचावून मतयाचना करत होते ,

यादरम्यान महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या राज्य सरकारने देव केलेल्या पाच गॅरंटी सह विविध योजनांचची माहिती देत वाहन पुढे निघत होते, अशा ह्या भव्य शक्ती प्रदर्शनामध्ये अनेक महिला कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे त्याचबरोबर बॅनर घेऊन अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते , उत्साही शक्ती प्रदर्शनामध्ये हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग पहावयाला मिळाले पाहूया तर चला एक क्षण,, सकाळपासून दुपारपर्यंत चाललेल्या या भव्य शक्ती प्रदर्शनामध्ये अनेक जणांचा सहभाग पाहावयाला मिळाला मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात विविध भागातील युवा वर्ग महिला वर्ग सहभागी झालेले पाहून भारतीय जनता पक्षाला आव्हानच देण्यासारखे ही शक्ती प्रदर्शन रॅली ठरली होती ,