Spread the love

*जोकमार आला,अंगारा घ्या.*
भाद्रपद महिण्यात श्री गणेश उत्सवानंतर अनंत चतुर्थी झाल्यावर जी पौर्णिमा येते तेंव्हापासून जोकमार म्हणून देव असतो त्यांच अस्तित्व सुरु होतं म्हणून संबंधित भागातील एक घराण्यातील महिला श्री जोकमार देवाला बुट्टित ठेऊन गल्लोगल्ली फिरत जोकमार आला,अंगारा घ्या म्हणून आवाहन करत असतात.भक्त सुपातून तांदूळ, यथाशक्ती दक्षणा देत असतात.यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी या देवाला जास्त मानतात.कारण पुढिल तीन महिने याच देवाच्या अधिपत्याखाली स्रूष्टी चालते म्हणतात. शेतकरी शेतातील पीकं रोगराईमुक्त होऊन सम्रूध्दी तसेच बरकत यावी.आपल्या घरातील मुलंबाळ,जनावरं तंदुरुस्त रहावी म्हणून घरासमोर आलेल्या या जोकमार देवाला सुपातून तांदूळ,दक्षणा रुपाने पैसे देतात.तर त्याबदल्यात ती पुजारीन महिला कडिलिंबाची पानं मीसळलेला अंगारा सुपात घालतात.तो अंगारा घरातील सर्वजन लावून घेत थोडा ठेवतात. अनंत चतुर्थी नंतर येणाऱ्या पौर्णिमेला शेतकरी जोकाऱ्याची पुनाव म्हणतात.त्या दिवशी शेतकरी पहाटे उठून जिथे चरक म्हणून दिली जाते तिथे जाऊन चरक (पाच प्रकारची भाजी,भात,शेतीला उपयुक्त असा झाडपाला त्याचबरोबर अंगारा मीसळून एका मोठ्या भांड्यात ते ठेवल जात.आणी जाणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना ते थोड थोड दिलजात.त्याला चरक म्हणतात.ते घरी आनून घरात केलेला ताजा भात,दही घेऊन त्यात जी चरक देतात ती मीसळून केळिच्या पानात घेऊन नंतर कपड्यात बांधली जाते.त्याचबरोबर शेतकरी जातानां आपल्याबरोबर वेगळा दहिभात,बटाटा,वांग्याची मीक्सभाजी डब्यात घेतात.त्याबरोबर पूजा साहित्य घेत गणेशोत्सवात राखून ठेवलेल्या फटाके,बॉंबही घेऊन जातात.कारण यावेळेस भातपीकं अगदी भरात,पोटरी रुपात असतात ती शेवटपर्यंत निरोगी,सुद्द्रूढ रहात धान्यात सम्रूध्दता यावी म्हणून शेतात ती चरक ठेऊन पीकाची यथासांग पूजा केली जाते.त्यानंतर फटाके,बाँब उडवले जातात.त्यानंतर डब्यातून दहिभात,भाजी नेलेले बांधावर बसून पीक पहात जेवण करत त्रूप्त व्हायच असत.अशी यामागची अख्यायिका आहे.