
यादव समाज युवा घटकाच्या कर्नाटक राज्याध्यक्षपदी श्री देवेंद्र सन्नमनवर यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ बेळगाव येथे गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा सन्मान सोहळा समाजसेवक व युवा नेते तसेच भाजप बेळगाव महानगर जिल्ह्याचे कार्यदर्शी श्री नागराज पाटील यांच्या पुढाकारातून पार पडला.
या प्रसंगी मित्रपरिवार व मार्गदर्शकांची उपस्थिती लाभली असून कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली. कार्यक्रमास नगरसेवक श्री मोहन हुग्गार, माजी भाजप बेळगाव महानगर अध्यक्ष श्री शशिकांत पाटील, ज्येष्ठ वकील श्री विनोद पाटील, वकील श्री धन्यकुमार पाटील, श्री लिंगराज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समारंभात उपस्थित मान्यवरांनी श्री देवेंद्र सन्नमनवर यांच्या युवा नेतृत्वगुणांचे व समाजसेवेतील योगदानाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. यादव समाजाच्या युवक संघटनेला त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यादव समाज युवा घटकाच्या राज्याध्यक्षपदी देवेंद्र सन्नमनवर; बेळगावात भव्य सत्कार सोहळा
Related Posts
जीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न
Spread the loveजीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असा महान संदेश देणारे थोर समाज सुधारक सदगुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र…
किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात*
Spread the love*किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात* महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी अस्मिता व सीमाप्रश्नी जागृतीसाठी बेळगावसह सीमाभागात मराठी सन्मान यात्रेची घोषणा युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष…
