Spread the love

पहिले बालकवी संमेलन सोमवारी
कवी शिवाजी शिंदे संमेलनाध्यक्ष

तारांगण सरस्वती इन्फोटेक आणि पोमांना बेनके यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी तीन वाजता कॅन्टोन्मेंट मराठी शाळा , खानापूर रोड, बेळगाव च्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बेळगाव सीमा भाग हा साहित्याची पंढरी म्हणून ओळखला जातो .16 ते 17 साहित्य संमेलने या सीमा भागात आयोजित केली जातात या सीमा भागातील नव्या पिढीने साहित्य कडे वळावे आणि साहित्याची चळवळ व्यापक व्हावी,त्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजित केलेली केले आहे सीमा भागातील बालकवींना व्यासपीठ आणि एक प्रेरणा संमेलन निमित्त मिळत आहे. सरस्वती इन्फोटेक कम्प्युटर एज्युकेशन आणि पोमाना बेनके या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष दैनिक पुढारीचे उपसंपादक, कवी श्री शिवाजी शिंदे हे आहेत. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील,पुणे येथील उद्योजक श्री रविंद्र बिरजे,श्री.विनोद बामणे,ज्योती बामणे, पोमण्णा बेनके, डॉ. दत्तप्रसाद गिजरे, डॉ. गोविंद मिसाळे , ॲड.सुधीर चव्हाण,श्री.प्रशांत बिर्जे आहेत. जवळजवळ 40 पेक्षा जास्त विद्यार्थी याच्यामध्ये कविता सादर करणार आहेत. या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी उपस्थिती दर्शवावी असे असे आयोजकांच्याकडून कळविण्यात आले आहे .
यावेळी स्केटर देवेन बामणे कराटेपटू ईश्वरी मंडोळकर यांचा सन्मान केला जाणार आहे.
श्री शिवाजी शिंदे
परिचय
श्री शिवाजी शिंदे हे पत्रकार लेखक आणि कवी अशी बेळगाव सीमा भागात त्यांची ओळख आहे.मागील 20 वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. 25 वर्षापासून कविता लेखन करत आहेत. २०१३ पासून दैनिक पुढारी मध्ये उपसंपादक म्हणून काम करत आहेत. 2012 हिरवे गाणे हा कवितासंग्रह प्रकाशित केला या कवितासंग्रहाला कोल्हापूरच्या न . ना.देशपांडे पुरस्कार व बेळगावच्या वाङ्मय चर्चा मंडळ यांच्याकडून पुरस्कार मिळालेला आहे.

2014 साली कवी अविनाश ओगले स्मृती पुरस्कार मिळाला आहे.
निलजी येथील बालसाहित्य संमेलनात त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
२०२०या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या मराठी साहित्य संमेलनात कवी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पद भूषवले आहे.
सन 2022 मध्ये त्यांनी राणी चन्नमा विद्यापीठाच्या मराठी विभाग आयोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. सन २०२५ च्या येळ्ळूर साहित्य संमेलनाचा साहित्य रत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विविध दिवाळी अंकातून त्यांच्या कविता आणि कथा प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ग्रामीण जीवनाशी निगडित असे त्यांचे साहित्य आह 2014 साली कवी अविनाश ओगले स्मृती पुरस्कार मिळाला आहे.
निलजी येथील बालसाहित्य संमेलनात त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
२०२०या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या मराठी साहित्य संमेलनात कवी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पद भूषवले आहे.
सन 2022 मध्ये त्यांनी राणी चन्नमा विद्यापीठाच्या मराठी विभाग आयोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. सन २०२५ च्या येळ्ळूर साहित्य संमेलनाचा साहित्य रत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विविध दिवाळी अंकातून त्यांच्या कविता आणि कथा प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ग्रामीण जीवनाशी निगडित असे त्यांचे साहित्य आहे