Spread the love

*आबा व हिंद स्पोर्ट्स क्लब तर्फे भव्य जलतरण स्पर्धांचे आयोजन*

शनिवार दिनांक सात व रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी गोवावेस महानगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये तिसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेचे आयोजन आबा व हिंद स्पोर्ट्स तसेच क्रीडा भारती बेळगाव यांच्या तर्फे आयोजन केले आहे. या स्पर्धा मुला मुलींच्या विविध गटामध्ये घेण्यात येतील व या स्पर्धेला
बेळगावसह बेंगलोर, गोवा, कोल्हापूर, पुणे, सांगली, हुबळी, धारवाड येथून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकलेले जलतरणपटू भाग घेणार आहेत असे आबा स्पोर्टस क्लबचे जलतरण प्रशिक्षक तसेच इव्हेंट डायरेक्टर श्री विश्वास पवार हे कळवितात.