वळपे (गोवा) : किडनी स्टोनसह विविध जुन्या आजारांवर होमिओपॅथिक पद्धतीने उपचार करणारे बेळगावमधील प्रसिद्ध “किडनी स्टोन क्लिनिक” आता गोव्यातही उपलब्ध झाले आहे. रुग्णांची वाढती गरज लक्षात घेऊन क्लिनिकचे संचालक डॉ. भूषण देसाई यांनी वळपे, गोवा येथे नव्या शाखेचे उद्घाटन केले असून, या शाखेत डॉ. भारती देसाई रुग्णांना सेवा देणार आहेत.
बेळगावमधील या क्लिनिकने आतापर्यंत किडनी स्टोन, दमा, थायरॉईड विकार, नेफ्रोटिक सिंड्रोम, मूळव्याध, स्त्रियांचे विकार, पित्ताशयातील खडे, त्वचा व केसांचे आजार, तसेच मणका व चकतीचे त्रास अशा विविध दीर्घकालीन आजारांवर उपचार करून अनेक रुग्णांचा विश्वास जिंकला आहे. विशेष म्हणजे, सर्जरी न करता किडनी स्टोनवर उपचार करण्यात येत असल्याने या क्लिनिकची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
गोव्यातील अनेक रुग्णांना उपचारासाठी बेळगावला जावे लागत होते. मात्र अंतराची अडचण लक्षात घेऊन स्थानिक पातळीवरच सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प डॉ. भूषण देसाई यांनी केला. त्यानुसार वळपे येथे नव्या शाखेची स्थापना करण्यात आली आहे.
या उद्घाटन प्रसंगी डॉ. भारती देसाई, परशराम पाटील, सुनिता पाटील, अन्नपूर्णा देसाई, बाबुराव देसाई, प्रभावती देसाई, योगिता देसाई, विशाल पाटील, संदीप पाटील, जयसिंग देसाई, तृप्ती देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. भूषण देसाई व डॉ. भारती देसाई यांनी गोव्यातील नागरिकांनी या क्लिनिकच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

बेळगावच्या ‘किडनी स्टोन क्लिनिक’ची गोव्यात एंट्री; वळपे येथे नवी शाखा सुरू
Related Posts
शाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी
Spread the loveशाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी न्यूज: बेळगावातील शाहापूर परिसरात शिवसंस्कृतीचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने शिवकालीन युद्धकलेचा भव्य आणि थरारक कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार
Spread the loveयेळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार येळ्ळूर दि. 17- येळ्ळूरमधील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट उसळली. मराठी भाषीकांच्या हृदयावर घाव घालून…
