हंदिगनूरसह म्हाळेनट्टी, बोडकेनट्टी, होसोळी, कानभावी, कुरिहाळ केएच व कुरिहाळ बीके या सात गावांची आराध्यदैवत श्री महालक्ष्मी यात्रेला सध्या मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. सध्या देवी महालक्ष्मी गदगे स्थानावर विराजमान असून, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी लांबच लांब रांग लागलेली पाहायला मिळत आहे.
यात्रा ठिकाणी भव्य शामियाना उभारण्यात आला असून आकर्षक रोषणाईमुळे परिसर उजळून निघाला आहे. यात्रा उत्सव कमिटीच्या दक्ष नियोजनामुळे सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडत आहेत. भाविकांकडून महालक्ष्मीला मोठ्या प्रमाणात दागिने तसेच आर्थिक मदत अर्पण केली जात असून, श्रद्धेचा ओघ वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हंदिगनूर येथील शिवाजी गल्लीतील भाविकांनी देवीला बांगड्या अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली आहे. तसेच अनेक भाविक विविध प्रकारच्या भेटवस्तू आहेर स्वरूपात देत आहेत.
यात्रा परिसरात मनोरंजनासाठी विविध खेळणी, पाळणे तसेच लंडन झुला यांसारखी आकर्षणे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे भाविकांची खरेदीकडेही मोठी ओढ दिसून येत आहे. रविवारी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, यात्रेची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे.

हंदिगनूर महालक्ष्मी यात्रा उत्साहात; भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजला
Related Posts
भरधाव दुचाकीची धडक; एम. के. हुबळीतील 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
Spread the loveकित्तूर : भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एम. के. हुबळी येथील 59 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव…
आरसीबीच्या विजयाचा जल्लोष पाहायला निघालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; बुलेट दुचाकी डिव्हायडरवर आदळली
Spread the loveबैलहोंगल शहरात आरसीबीच्या आयपीएल विजयानंतरचा जल्लोष पाहण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विनायक अनिल रायर (वय 23, रा. बसवनगर, 4 था…
