-
जीएसएस पीयू कॉलेजचा जेईईत झळाळता यशस्वी ठसा; कुमार आर. शंकरराज यांना 99 टक्के पर्सेंटाइ

बेळगाव: जीएसएस पीयू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या जेईई (JEE) परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेचा मान उंचावला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेकडो विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेत घवघवीत यश संपादन केले.विद्यार्थ्यांच्या यशामागे कॉलेजच्या अध्यापक व प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि शैक्षणिक सहाय्य महत्त्वाचे ठरले आहे. अभ्यासाच्या दृष्टीने सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिल्याने होतकरू विद्यार्थ्यांना यशाची भरारी घेता आली. प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी यशाचे नवे शिखर गाठत आहेत.
विशेष म्हणजे, कुमार आर. शंकरराज यांनी जेईई मेन्स परीक्षेत 99 पर्सेंटाइल गुण मिळवून कॉलेज, एसकेई संस्था तसेच जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य एस. एन. देसाई, संस्थेचे चेअरमन डॉ. श्री किरण ठाकुर, व्हाइस चेअरमन श्री एस. वाय. प्रभू आणि प्राध्यापक वर्गाने अभिनंदन केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जीएसएस पीयू कॉलेज आणि एसकेई संस्था विद्यार्थ्यांना निस्वार्थ भावनेने सहकार्य करत असून भविष्यातही ही यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
जीएसएस पीयू कॉलेजचा जेईईत झळाळता यशस्वी ठसा; कुमार आर. शंकरराज यांना 99 टक्के पर्सेंटाइ
Related Posts
रायगड जिल्ह्यातून सीमावाद मोहिमेला बळ; पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Spread the love रायगड जिल्ह्यातून सीमावाद मोहिमेला बळ; पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव सीमावादाच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला रायगड जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळू लागला…
‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; 10 वर्षांची लढाई संपली
Spread the loveबेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर येथे २०१४ साली घडलेल्या ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक प्रकरणातील सर्व सात खटल्यांचा शेवट अखेर झाला असून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल दहा…
