Spread the love

बेळगाव:

बेळगाव जिल्ह्यातील 22 पूल पाण्याखाली गेले असून 160 घरे कोसळली आहेत. तर निप्पाणी तालुक्यातील 22 पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे सतत पाऊस सुरू असल्यामुळे नदीकाठील गावाला पुराचा धोका दर्शविला जात आहे, बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून जिल्ह्यातील नद्या धोकादायक पातळीवर पोहोचल्या असून जलाशये ओव्हरफ्लो झाली आहेत. नदीकाठच्या शेतजमिनीत पाणी शिरले असून पिके पाण्याखाली गेली आहेत.
पश्चिम घाट प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु असून परिणामी बेळगाव जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. कृष्णा, मलप्रभा, घटप्रभासह जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहत असून खानापूर, गोकाक, मु डलगी, हुक्केरी, चिक्कोडी, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विविध ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

दूधगंगा नदीवरील भोज-कारदगा पुलावर 16 फूट, मल्लिकवाड- दोनवाड पुलावर 13 फूट तर भोज जनवाड-निप्पाणी येथील खालच्या पुलावर 12 फुटांपेक्षा जास्त पाणी आले आहे.

खानापूरमध्ये 55.4 मिमी, पनिप्पाणीमध्ये 37.4 मिमी, बेळगावमध्ये 22.7 मिमी, चिक्कोडीमध्ये 21.0 मिमी, कागवाडमध्ये 15.0 मिमी, रायबागमध्ये 16.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसामुळे एकूण 160 घरांची अंशत: पडझड झाली आहे. खानापुर- 27, हुक्केरी- 11, बैलहोंगल- 2, कित्तूर- 22, सौंदत्ती- 26, रामदुर्ग- 41, गोकाक- 3, मुडलगी- 4, चिक्कोडी- 1, यरगट्टी- 20, अथणी- 2, निप्पाणी- 2 अशा पद्धतीने घरांची अंशतः पडझड झाली आहे.

तर खानापुर आणि सौंदत्ती येथील दोन घरे पूर्णपणे कोसळली आहेत. 51 हेक्टरवरील शेती पिकांचे तर 21.24 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासन ही संभाव पुरापासून होणारी नुकसान टाळण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करत असल्याचे समोर येते .