बेळगाव :
पावसाळ्याच्या निसर्ग वातावरणामध्ये ठराविक महिन्यामध्येच बाजार मध्ये पाहायला मिळतात गुरुवारी अचानकपणे दुपारपासून बेळगाव गणपत गल्ली मार्केट व शहापूर खडे बाजार मार्केटमध्ये ठिकठिकाणी विक्रीला बसलेले आळंबी पाहायला मिळाले, बेळगाव ग्रामीण भागातील शेतकरी आळंबी विक्री करणारे पाहायला मिळाले, हंगामानुसार उपलब्ध होणाऱ्या भाजीपाल्याची चव चाखण्याची मजा काही औरच असते.. सध्या पावसाला सुरुवात झाली असून बाजारपेठेत अळंबीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वर्षातील बाराही महिने फार्मिंगच्या माध्यमातून उत्पादन घेतलेली अळंबी म्हणजेच बटन मशरूम उपलब्ध असते. . मात्र या हंगामात येणाऱ्या पारंपरिक अळंबीचा आस्वाद घेणे हे कित्येकांच्या पसंतीचे असते. सध्या अळंबी खरेदीसाठी बाजारपेठेत खवय्यांची गर्दी होत आहे. निसर्गाने आपल्याला विविध वनस्पती अन्नपदार्थांच्या स्वरूपात दिल्या आहेत. यापैकीच एक असणारी हि वनस्पती म्हणजे अळंबी. जगभरात अळंबीच्या विविध प्रजाती उपलब्ध आहेत मात्र नैसर्गिक पद्धतीने वाढणाऱ्या या अळंबीला पावसाळ्यात विशेष पसंती दिली जाते.