Spread the love

 

*सर्वदा सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा*

भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन आज गोंधळी गल्ली येथील सर्वदा मल्टिपर्पज को.ऑप. सोसायटीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या फोटोचे पूजन संचालक श्री.आनंत पावशे यांच्या हस्ते तर ध्वजारोहन संस्थेचे संचालक श्री.बाबू पावशे यांच्या हस्ते करण्यात आले, राष्ट्रगीताने तिरंगा झेंड्याला मानवंदना देण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन पुरोहित,उपाध्यक्ष धनंजय पाटील,संचालक रमेश पाटील,श्रीनाथ बेळवडी,संजय पाटील,चंद्रकांत मेलगे,संतोष अर्कसाली,संचालिका रूपा साखरे,शीतल शंभुचे,सेक्रेटरी मोहन कोचेरी, शाखा व्यवस्थापक राजू मुतकेकर,रूपाली खांडेकर,संगीता कुंडेकर,भरमा बेळगावकर,यल्लप्पा वळतकर,सुनील पाटील,योगेश गौडाडकर व इतर उपस्थित होते.