बेळगाव :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमाभागाचे मंत्रिमंडळातील प्रतिनिधी असतानाही ते एकदाही सीमाभागात गेले नाहीत. केवळ सुरक्षेच्या कारणावरून त्यांनी सिमवासियांकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी तोफ डागली आहे.
आम्ही कधीही सीमाप्रश्नाच्या बाबतीत माघार घेतली नाही, आमच्यावर अनेक केसीस आहेत. अटक सुद्धा झाली आहे. पण आम्ही घाबरत नाही. बाकीचे केवळ आम्ही ही लढाई लढलो, ती लढाई लढलो असे सांगत उर बडवून घेतात असा टोला लागवताना राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना भित्रे ठरविले आहे. वकील खटल्याच्या कामकाजाला का हजर राहत नाहीत, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.
49c9c83e-0b97-4e94-bcd7-4e653342bead