बेळगाव:
मुतगा ग्रामपंचायत हद्दीतील शाळा आणि हॉस्पिटलला जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे शाळा विद्यार्थ्यांना व हॉस्पिटलला जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, या रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने पावसाचे पाणी साचून चिखल निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थी शाळेला जाताना पडल्याचेही घटना घडली असली तरी याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील यांनी आपल्या वाहिनीशी बोलताना सांगितले,, ग्रामपंचायत एक्सटेन्शन एरियामध्ये सुधारणा करत आहे, अर्थात जिथे लाभ मिळतो याकडेच लक्ष देत असल्याचे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले, शनिवारी शाळेमध्ये शाळा सुधारणा कमिटीची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीला हजर राहण्यासाठी म्हणून गेलेल्या पालक वर्ग या रस्त्यावरून संचार करतेवेळी ही दुर्दशा पाहून विद्यार्थी इथून शाळेला कसे जात असेल असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला, आणि या रस्त्याची दुरावस्था पाहून महिला पालक अस्मिता पाटील या रस्त्याबद्दल कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, या मार्गावरून रुग्ण हॉस्पिटलला जात असतात याचबरोबर दररोज शाळेचे विद्यार्थीही ये जा करत असतात पण रस्त्याची दुरावस्था वाहून साऱ्यांनाच आश्चर्य वाटण्याजोगे आहे, याकडे तातडीने लक्ष देऊन ग्रामपंचायत अभिवृद्धी अधिकाऱ्याने हा रस्ता निर्माण करावा अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे. या रस्त्या संदर्भात ग्रामपंचायत उपाध्यक्ष श्याम मुतगेकर यांनाही याची कल्पना यावेळी देण्यात आली, पण हा रस्ता तात्पुरता का होईना दुरुस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली,