Spread the love

बेळगावचे सुहास निंबाळकर यांनी परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले

बेळगाव ॲक्वा डॉल्फिन ग्रुप बेळगावचे अध्यक्ष श्री. सुहास निंबाळकर, वय 72 वर्षे, यांनी कॉर्पोरेशन स्विमिंग पूल गोवावेस बेळगावी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पाण्यामध्ये व पाण्याखाली नॉन स्टॉप वॉटर योगा (जल योगा) करून विक्रम केला होता या विक्रमा ची नोंद परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नी घेतली असून नुकतच त्यांना परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने प्रमाणपत्र व सन्माचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.या कार्यक्रमासाठी आबा स्पोर्टस् क्लब स्पोर्ट्स क्लब आणि एक्वा डॉल्फिन ग्रुप बेळगावी यांचे सहकार्य लाभले.
जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार ,सतीश पाटील, विवेक मिसाळ, विनायक अर्कसाली, मुकेश शिंदे, प्रशांत कांबळे, गुरुराज कुलकर्णी, महंतेश नवळगुंद,राजू जागळे,अजित केळवळकर, मिलिंद सांबरेकर,महादेव केसरकर, अनिल पाटील, राजू पुजारी, वैभव व्हर्णेकर बाबू कांबळे, विनायक नाईक, गजानन शिंदे,अशोक पाटील , परशुराम कांबळे हरीश वाचानी, उमेश कांबळे,प्रदीप पाटणकर,कल्लप्पा पाटील , आबा स्पोर्टस् क्लब बेळगावी व ॲक्वा डॉल्फिन ग्रुपच्या सदस्यांनीयांनी निंबाळकर जलयोग सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते.