बेळगाव :
राजहंस गेलीचा राजा हा संघ, प्रथम फलंदाजी करत असताना, ४ षटकांच्या मोबदल्यात ३ गडी बाद २९ धावा जमवल्या,
प्रतिउत्तरार्थ धावा करत असताना, एस. आर. एस. हिंदुस्थान या संघाने अवघ्या ३ षटकातच १ गडी बाद ३० धावा करत विजय संपादन केला,
अंतिम सामन्याचा उत्कृष्ट खेळाडू ठरला उमेश बाळू कुर्याळकर,
तसेच मालिकेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरला गजानन हसबे हा एकूण १० गडी बाद करत पुरस्कार पटकाविला,
उत्कृष्ट फलंदाज ठरला तो ओमकार संभाजी जाधव याने एकूण 85 धावा जमविल्या,
नागेश सोमनाचे हा अपकमिंग प्लेयर ठरला,
संपूर्ण मालिका वीर ठरला तो उमेश बाळू कुर्याळकर यांने एकूण १३१ धावा व ६ गडी बाद करत मालिकावीराचा मानकरी ठरला.
पुरस्कार प्रदान करताना उपस्थित मान्यवर होते ते मनोज चवरे, राजू मुधोळकर, रवी येळूरकर, बाळू कुर्याळकर, संदीप मुधोळकर, मल्लाप्पा होळकर व एस. आर. एस. हिंदुस्थान हा विजेता संघ उपस्थित होता.