हिंडलगा/वार्ताहरम्हैसूर येथे झालेल्या दसरा क्रीडा महोत्सवात मण्णूर गावचा उदयोन्मुख धावपटू तसेच भरतेश महाविद्यालयाचा विद्यार्थी तुषार वसंत भेकणे यांने धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण हॅट्रिक साधली आहे. तुषार याने 400 मीटर आणि 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात दोन सुवर्णपदके पटकावली असून ४ बाय १०० रिले प्रकारात सांघिकरित्या सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. तसेच 400 आणि 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेतील यापूर्वीचा विक्रम देखील त्याने मोडीत काढला आहे. तुषार यांने दोन महिन्यापूर्वीच म्हैसूर येथे नुकताच झालेल्या कर्नाटक राज्य आंतर जिल्हा ज्युनियर आणि 23 वर्षाखालील अथलेटिक्स स्पर्धेत 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 1 मिनिट 49.71 सेकंदात अंतर कापत राज्यात नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. यानंतर त्याची बिहार अथलेटिक्स असोसिएशनतर्फे पाटणा येथे आयोजित चौथ्या इंडियन ओपन यु-23 ॲथलेटिक्स कॉम्पिटिशनसाठि निवड झाली होती. त्यातही त्यांने द्वितीय क्रमांक पटकावला होता. आता पून्हा म्हैसूर येथे देखील त्यांने तीन सुवर्ण पदके पटकावून बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याबद्दल त्याचे सर्व थरातून अभिनंदन होत असून, मण्णूर गावात आज त्याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्याला स्टँडर्ड ट्रॅक स्पोर्ट्स बेळगावचे प्रशिक्षक प्रदीप जुवेकर, खेलो इंडिया बेंगळूरचे प्रशिक्षक वसंत यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर वडील मार्कंडेय सोसायटीचे सेक्रेटरी वसंत भेकणे यांचे प्रोत्साहन लाभत आले.———————–
मण्णूरच्या तुषार भेकणेची म्हैसूरमध्ये गोल्डन हॅट्रिक
Related Posts
मास्टर आर्ट कॉम्पिटिशन , मुंबई. चित्रकला स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाचे घवघवीत यश .
Spread the loveमास्टर आर्ट कॉम्पिटिशन , मुंबई. चित्रकला स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाचे घवघवीत यश . मास्टर आर्ट कॉम्पिटिशन , मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी संपूर्ण भारतभर चित्रकला स्पर्धा , टी-शर्ट रंगविणे ,…
एंजल फाउंडेशनच्या वतीने आयोजित खुल्या जिल्हास्तरीय* *स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार*
Spread the love*एंजल फाउंडेशनच्या वतीने आयोजित खुल्या जिल्हास्तरीय* *स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार* बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन व एंजल फौंडेशन ग्रामीण विकास व शिक्षण संस्थेतर्फे आयोजित खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धां…