*येळळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात*
येळळूर, ता. 23: येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डी.जी. पाटील होते. सोसायटीचे चेअरमन डी.जी. पाटील व व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. तर नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे, संचालक प्रा.सी.एम गोरल व रवींद्र गिंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना चेअरमन डी.जी. पाटील म्हणाले, गेल्या 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 साली आम्ही नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना स्वातंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून केली. सोसायटीला आज 25 वर्षे पूर्ण होत आहेत. संस्था दिवसेंदिवस प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडत आहे. संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार व हितचिंतक तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे व झोकून देऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्थेने अल्पावधीतच गरुड झेप घेत, येळळूर व परिसरात आपला नावलौकिक मिळवला आहे. वडगाव व येळळूर येथे स्वतःच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर परमेश्वर नगर येळळूर येथे नेताजी मराठी सांस्कृतिक भवनाची उभारणी करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनीही संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संचालक बि. डी. छत्र्यान्नावर, संजय मजुकर, सी.एम.उघाडे, परशराम गिंडे, शंकर मुरकुटे, पांडुरंग घाडी, अनिल मुरकुटे, डॉ. कुलदीप लाड, सेक्रेटरी दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे, विजय धामणेकर, रवि कणबरकर, कांचन पाटील, ज्योती यरमाळकर,सोनाली सायनेकर,
संगीता दणकारे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सी एम गोरल यांनी केले. तर आभार दीपक हट्टीकर यांनी मानले.
फोटो वृत्त -येळळूर: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करताना चेअरमन डी. जी.पाटील समवेत रघुनाथ मुरकुटे, प्रा. सी.एम. गोरल, रवींद्र गिंडे, किरण गिंडे, शंकर मुरकुटे, पांडुरंग घाडी, अनिल मुरकुटे व इतर
येळळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात*
Related Posts
जीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न
Spread the loveजीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असा महान संदेश देणारे थोर समाज सुधारक सदगुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र…
किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात*
Spread the love*किल्ले रायगडावरून झाली मराठी सन्मान यात्रेची सुरुवात* महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी अस्मिता व सीमाप्रश्नी जागृतीसाठी बेळगावसह सीमाभागात मराठी सन्मान यात्रेची घोषणा युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष…
