Spread the love

बेळगाव :

लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मंगळवार दिनांक 7 मे रोजी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. निर्भयपणे मतदान पार पाडण्यासाठी सुमारे दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त बेळगाव जिल्ह्यात तैनात करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.
मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्राच्या 200 मीटर बाहेर एक टेबल आणि दोन खुर्ची ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्यांना मतदान कार्ड मिळालेले नाही. त्यांना मतदान यादीमध्ये नाव असल्यास मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.
मतदान करण्यासाठी त्या व्यक्तीने आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड,बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, निवृत्त वेतन कार्ड, नोकरी करत असलेले कोणत्याही प्रकारचे आयडेंटिटी कार्ड यामधील एखादे कार्ड असेल तर त्यांना मतदानाचा हक्क दिला जाणार आहे.
लोकसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळपासूनच मद्य विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पुढील तीन दिवस मद्य विक्री व पुरवठा बंद राहणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिलीआहे,