बेळगाव:
बेळगाव सौंदत्ती डोंगरावरील श्री यल्लमा देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावाकडे परतणाऱ्या भाविकांच्या वाहनावर काळाने घाला घातलेला आहे ही दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे भाविकांच्या ट्रॅव्हलने थांबलेल्या ट्रकला भीषण धडक दिली यामध्ये 13भाविकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पहाटे ही यल्लमा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातलेला आहे. मृतांमध्ये सात महिलांसह लहान मुले व पुरुषांचा समावेश आहे.
अधिक माहिती अशी की थांबलेला ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलने जोराची धडक दिली या भीषण अपघातात 13 भाविक जागीच ठार झाले. ही घटना ब्याडगी तालुक्यातील गुंडेहळी येथे घडली आहे. सर्वमृत शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती येथील आहेत अपघातानंतर घटनास्थळी मृतदेह रस्त्यावर विखुरले होते.