बेळगाव :
विविध ठिकाणी घरफोड्या करणार्या कुख्यात चोरट्यासह सोन सकाळी लांबवणार्या भामत्यालाअटक करण्यात आली आहे. रविवारी उद्यमबाग पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून सुमारे अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
रफिक मोहम्मद शेख (रा. ठाणे रा. महाराष्ट्र) आणि प्रज्वल खानजे (रा. धामणे येळ्ळूर) अशी त्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उद्यमबाग पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येणार्या उद्यमबाग चन्नम्मा नगरसह विविध ठिकाणी घरफोड्या तसेच सोनसाखळी लांबवण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी घटनांची नोंद करून घेऊन चोरट्यांचा तपास चालविला होता.
रफिक शेख याला महाराष्ट्रातून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने महाराष्ट्रासह बेळगावातील विविध पोलिस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलिस स्थानकात नव्वद हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
चन्नम्मा नगरसह मजगाव परिसरात सोन सकाळी लांबवणार्या प्रज्वल खानजे याने देखील सोनसाखळी लांबवण्यासह घर फोडी केल्याची कबुली दिली.
त्यानुसार त्यांच्याकडून एकूण पाच प्रकरणात 10 लाख 76 हजार 900 रुपये किमतीचे 148 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने. 3800 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.