Spread the love

*शिवारात कुपनलिका खोदून केली सहा गल्ल्यांमध्ये पाण्याची सोय*: *ग्रामपंचायत अध्यक्षा व सदस्यांचा पुढाकार,नागरिकांतून समाधान व्यक्त*
येळळूर, ता. 21: येथील मुल्याची वाट या पाणंद रस्त्यावर दोन ठिकाणी कुपनलिका खोदून, सिद्धेश्वर गल्ली, संभाजी गल्ली, सुभाष गल्ली, वाडी भाग अशा सहा गल्ल्यांमध्ये येळळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे, राजू डोन्यान्नावर यांच्या प्रयत्नातून व ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून विविध ठिकाणी नळांच्या चाव्या बसवून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. त्यामुळे येथील महिला व नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायत व्याप्तीमध्ये येणाऱ्या प्रभाग क्रमांक तीन चार यामध्ये प्रामुख्याने सुभाष गल्लीच्या दोन्ही बाजू. सिद्धेश्वर गल्ली .संभाजी गल्ली. व संभाजी गल्लीच्या पाठीमागील बाजूचा काही भाग. येथे गेल्या 50 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती होती. ऐन उन्हाळ्यात या भागातील महिलांना पाण्यासाठी वाडी भागात असणाऱ्या गोड्या भावीच्या पाण्यावरती अवलंबून राहावे लागत होते. .यासाठी या भागातील पाण्याची समस्या दूर व्हावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे, ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांनी स्वतः संभाजी गल्ली, सिद्धेश्वर गल्ली या भागातील महिलांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. तसेच या प्रभागातील ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे. रुक्मिणी नाईक. व राजू डोन्यान्नावर यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीमध्ये अनेक वेळा याविषयी आवाज उठवून ही समस्या दूर करण्याची पि.डि.ओ. पुनम गडगे तसेच ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांना विनंती केली होती .त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगातून या भागांमध्ये दोन ठिकाणी कुपनलिकेची खुदाई करून, सर्व सहा गल्ल्यांमध्ये नवीन पाईपलाईन घालून प्रत्येक गल्लीमध्ये नळ जोडण्यात आले. आज या संपूर्ण भागामध्ये पाणीपुरवठा सुरू करण्यात आला . त्यामुळे या भागातील महिलांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.