Spread the love

बेळगाव :

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 एप्रिल रोजी बेलगाव जिल्ह्यातील मालिनी शहर बीएस येदुरप्पा मार्ग (जुना पीबी रोड हलगा क्रॉस) येथे दुपारी 12 वाजता होणाऱ्या सभेत सहभागी होणार आहेत.

पंतप्रधानांचा हा आगामी दौरा या प्रदेशातील निवडणूक प्रचारात त्यांचा सतत सहभाग दर्शवितो. नरेंद्र मोदी यांनी याआधी बेळगाव जिल्ह्याचा दौरा अशाच उद्देशाने केला असून, राजकीय दृष्टीने या क्षेत्राचे महत्त्व पटवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून यावे या दृष्टिकोनातून यांचा दौरा आता बेळगाव नव्हेच तर संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी प्रचारद्वारे सुरू आहेत यामध्ये बेळगाव शहरातील मालिनी सिटी येथे होणाऱ्या सभेमध्ये ते भाग्य घेऊन भाजपाने देशासाठी केलेल्या कार्याची माहिती देत उमेदवार निवडून देण्याची जनतेला विनंती करणार असल्याचे समजते पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावला आल्यामुळे बेळगाव आणि चिकोडी मतक्षेत्रामध्ये याचा परिणाम होणार का यानंतर समजणार आहे