Spread the love

बेळगाव:

कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांचे कारवार मध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन मतदार संघातील तसेच राज्यातील काँग्रेसचे बडे नेते उपस्थित कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने कारवार शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले या शक्ती प्रदर्शनाच्या वेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उत्साह ओसंडून वाहत होता काँग्रेसने यावेळी नवी चाल करत खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांना कारवार लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली आहे. दरवेळी काँग्रेसमध्ये गट तटाचे राजकारण दिसून येत होते मात्र सिद्धरामय्या आणि डिके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली यावेळी अंजली निंबाळकर या महिला तसेच मराठा उमेदवाराला प्राधान्य देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसने चंद बांधला आहे

हे आजच्या शक्ती प्रदर्शनावरून दिसून येत आहे.शक्ती प्रदर्शनाच्या वेळी कारवार मतदारसंघासह आसपासच्या मतदारसंघातील बडे काँग्रेसचे नेते या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले होते.यात हल्ल्याळचे आमदार आर व्ही देशपांडे कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य कारवारचे आमदार सतीश सैल, शिरशीचे आमदार भीमाण्णा नाईक ,यल्लापुरचे माजी आमदार व्ही एस पाटील काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष साई गावकर चे कीत्तुरचे आमदार बस्सनगौडा पाटील काँग्रेसचे नेते नेविदीत अल्वा यासह कारवार लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय नेते उपस्थित होते

या शक्ती प्रदर्शनात कार्य काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता सकाळी 9 वाजता अंजली निंबाळकर यांनी शहरातील देवस्थानांना भेटी देऊन देव देवतांचे दर्शन घेतले

त्यानंतर जिल्हाअधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

यानंतर अकरा वाजता कमलादेवी मैदानावरून भव्य रोडशोला सुरुवात झाली यावेळी झांज पथक तसेच डीजे च्या गजरात या शक्तिप्रदर्शनच्या रॅलीला सुरुवात झाली यावेळी वाहनावर स्वतः अंजली निंबाळकर आर्वी देशपांडे कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद यासह विविध नेते उपस्थित होते शहरातील प्रमुख रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली या रॅलीच्या वेळी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले यात शिवाजी महाराज हंजा नाईक बाबासाहेब आंबेडकर सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला मालार्पपण करून अभिवादन करण्यात आले. कारवार शहर काँग्रेसमय झाले होते सहभागी महिला तसेच पुरुष कार्यकर्त्यांच्या डोक्यावर काँग्रेसची टोपी गळ्यात काँग्रेसचा पट्टा तसेच हातात काँग्रेसचा झेंडा घेऊन काँग्रेस कार्यकर्ते या शक्ती प्रदर्शनाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते

कार्यकर्त्यांच्या उत्साह ओसंडून वाहत होता सकाळी 11 वाजता सुरू झालेली मिरवणूक दुपारी दोन वाजता संपली भर रखरखत्या उन्हात ही कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते शहरातील प्रमुख रस्त्यावरून रॅली काढण्यात आल्यानंतर शिवाजी चौकात या रॅलीचे भव्य सभेत रुपांतर झाले या ठिकाणी उपस्थित काँग्रेसच्या नेत्यांनी अंजली निंबाळकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी भगवी साडी भगवा फेटा आणि गळ्यात काँग्रेसचा पट्टा घातला होता तर काँग्रेसच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी भगवे फेटे बांधले होते. त्यामुळे चर्चेच्या विषय बनला होता

पत्रकार परिषद व्हिडीओ

पत्रकारानीही याबाबत अंजली निंबाळकर यांना छेडले होते.यावेळी भगवा हा सर्व हिंदूंचा रंग असून त्याग आणि बलीदानचे प्रतीक आहे.म्हणूनच देशाच्या तीरंग्यातही भगव्याला वरचे स्थान आहे म्हणूनच आपण भगवा वेश आणि आणि भगवा फेटा परिधान केला आहे भगवा रंग हा कुणाची मक्तेदारी नसून प्रत्येक हिंदूंचे प्रतीक अआहे त्यांनी पत्रकारांना सांगितले . सकाळी नऊ वाजल्यापासूनच मतदार संघातून कार्यकर्ते कारवार येथील कमलादेवी मैदानावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमण्यास सुरुवात झाली होती.सकाळी 11 वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले होते. काँग्रेसचे प्रथमच अशा प्रकारचे शक्ती प्रदर्शन झाल्याचे बोलले जात होते. उन्हाचा तडका आणि प्रचंड उष्ण हवामान असून देखील कार्यकर्ते शेवटपर्यंत या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले होते